पुण्यात फर्निचरच्या दुकानाला भीषण आग, दुकानाचं कोट्यवधीचं नुकसान

पुणे-नगर रोड (Nagar Road)वर असणाऱ्या एका मोठ्या फर्निचरच्या दुकानाला आग लागली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीत दुकानाचं कोट्यवधीचं नुकसान झालं आहे.

    पुणे: पुण्यात (Pune) एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. हवेली तालुक्यातल्या वाघोली परिसरात ही आग लागली आहे. या आगीचे व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये आगीचं रौद्ररुप पाहायला मिळत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर रोड (Nagar Road)वर असणाऱ्या एका मोठ्या फर्निचरच्या दुकानाला आग लागली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीत दुकानाचं कोट्यवधीचं नुकसान झालं आहे.