गावठी कट्टा व काडतुसांसह एक जेरबंद ; लोणावळा पोलिसांची कारवाई

लोणावळा ग्रामीण पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मावळ तालुक्यातील पवनानगर या गावात कालेकर हा जिवंत काडतुसांसह गावठी कट्टे कमरेला लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून लोणावळा ग्रामीण विभागाचे सहायक पोलीस अधिक्षक नवनित काॅवत यांच्या पथकाने पवनानगर येथील राहत्या घराजवळ सापळा रचला.

    वडगाव मावळ/पवनानगर : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पवनानगर (ता. मावळ) राहत्या घरात एकाला एक गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसांसह जेरबंद केले. याप्रकरणी लोणवळा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडू अशोक कालेकर उर्फ के. के (रा. पवनानगर, ता. मावळ) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

    सापळा रचून घेतले ताब्यात

    लोणावळा ग्रामीण पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मावळ तालुक्यातील पवनानगर या गावात कालेकर हा जिवंत काडतुसांसह गावठी कट्टे कमरेला लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून लोणावळा ग्रामीण विभागाचे सहायक पोलीस अधिक्षक नवनित काॅवत यांच्या पथकाने पवनानगर येथील राहत्या घराजवळ सापळा रचला. बाहेरून आवाज दिला असता तो घरातून बाहेर आला. पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला शिताफीने पकडून त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा बनावटीची पिस्टल व तीन जिवंत काडतूस मिळून आले.

    या पथकाने केली कारवाई

    लोणावळा ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस नाईक अमित ठोसर, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस नाईक संतोष शेळके, पोलीस शिपाई स्वप्नील पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.