प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

    शिक्रापूर : शिक्रापूर ता. शिरुर येथील ट्रिनीटी लिमिटेड कंपनीतील एका कामगाराने दुसऱ्या कामगाराला काम सांगितल्याने एका कामगाराला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाणे येथे गणपत किसन इंधे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शिक्रापूर ता. शिरुर येथील ट्रिनीटी लिमिटेड कंपनीत आयनाज पटेल व गणपत इंधे हे दोघे कामाला असून, ते काम करत असलेल्या ठिकाणी आयनाज याने गणपत यास मोठा बॉक्स जेसीबीने उचलून बाजूला घे, असे सांगितले यावेळी गणपत याने ‘मला काम का सांगितले’, असे म्हणून चिडून जाऊन आयनाज याला शिवीगाळ, दमदाटी करत कंपनीतील साहित्याने मारहाण केली.

    या घटनेमध्ये आयनाज पटेल हा जखमी झाला. त्यामुळे आयनाज नबी पटेल (वय ५३ वर्षे रा. पाटवस्ती शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी गणपत किसन इंधे (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.