
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात पुणे जिल्ह्यातील यवत पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुणे : मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात पुणे जिल्ह्यातील यवत पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मांजरेकर यांनी आपल्याला शिविगाळ करुन चापट मारल्याचा आरोप कैलास सातपुते यांनी केला आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता हा प्रकार घडला. महेश मंजरेकर हे सोलापूरच्या दिशेनं चालले होते. मध्येच त्यांनी कारला अचानक ब्रेक लावला. त्यावेळी मागून येणाऱ्या कैलास सातपुते यांची ब्रिझ्झा कार मांजरेकरांच्या कारला धडकली. त्यात त्यांच्या कारचे किरकोळ नुकसान झाले. हे लक्षात येताच मांजेरकर गाडीतून उतरले आणि सातपुते यांना शिवीगाळ केली. दारू पिऊन गाडी चालवतोस का, असं म्हणत त्यांनी सातपुते यांना चापट मारली, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात भादविच्या कलम ३२३, ५०४ व ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील रहिवासी आहेत.
Maharashtra: A non-cognizable offence has been registered at Yavat Police Station in Pune against actor Mahesh Manjrekar for allegedly slapping and abusing a person over an incident of road rage on January 15.
— ANI (@ANI) January 17, 2021