प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

    पिंपरी : कोयता मिरवत आरडाओरडा करून दहशत पसरवणाऱ्या तरुणाला दिघी पोलिसांनी गजाआड केले. हा प्रकार बुधवारी (दि. ३०) दुपारी एकच्या सुमारास दिघी येथे पिरॅमिड हॉटेल चौकात घडला.

    साहिल सनउल्ला शहा (वय २३, रा. गजानन महाराजनगर, दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक हेमंत आव्हाड यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी साहिलने बुलेट दुचाकीवर बसून कोयता मिरवत इकडे-तिकडे भिरकावून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. कोणाला लय माज आलाय का, मी इथला दादा आहे, एकाएकाला बघून घेतो, असे मोठ्याने ओरडून दहशत माजविली. दिघी पोलीस तपास करत आहेत.