मुंबईहून टाकळी हाजीत आलेल्या एकाला कोरोनाची लागण

कवठे येमाई : मुंबई येथून शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी येथील साबळेवाडीत आलेलया एकाला कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीला सतत ताप येत असल्याने त्यांचे स्वँब पुण्याच्या औंध रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले असता त्यांचा रिपोर्ट कोरोना पाँझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप बिक्कड यांनी दिली आहे.

कवठे येमाई : मुंबई येथून शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी येथील साबळेवाडीत आलेलया  एकाला कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीला सतत ताप येत असल्याने त्यांचे स्वँब पुण्याच्या औंध रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले  असता त्यांचा रिपोर्ट कोरोना पाँझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप बिक्कड यांनी दिली आहे. यामुळे टाकळी हाजी परिसरात खळबळ उडाली आहे तर साबळेवाडी परिसर प्रशासनाने सिल केला आहे.
        सदरचा व्यक्ती हा कामोठे (नवी मुंबई ) येथून ४ तारखेला कुंटुबामधील तीन व्यक्तीना घेऊन आले होते.परंतु त्यामधील प्रमुख व्यक्तीला तीन दिवसा नंतर ञास होवू लागल्याने त्याचे स्वँब तपासणीसाठी बुधवारी पाठवण्यात आले होते.त्याचा रिपोर्ट गुरुवारी राञी मिळाला असून तो रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे.त्यांना होमक्वांरटाईन करण्यात आले होते.घरातील सदस्यांची देखिल तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉ. बिक्कड यांनी सांगितले .
  काही  दिवसांपुर्वी म्हसे बुद्रुक येथिल मुंबई येथून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. ती व्यक्ती आता कोरोना मुक्त झाली आहे. कोरोनामुळे नागरिकांनी घाबरून न जाता स्वतः ची व कुटूबांची काळजी घेवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन टाकळी हाजीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे केले आहे.