आंबेगाव तालुका कोरोनामुक्तीच्या मार्गावर असतानाच आढळला एक पॉझिटिव्ह रुग्ण

भिमाशंकर : आंबेगाव तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असताना दि.१७ रोजी वळती येथे एक ४० वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह निघाल्याने तालुक्यात भीतीचे सावट कायम आहे. आंबेगाव तालुक्यातील मागील काही

भिमाशंकर : आंबेगाव तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असताना दि.१७ रोजी वळती येथे एक ४० वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह निघाल्याने तालुक्यात भीतीचे सावट कायम  आहे.

आंबेगाव तालुक्यातील मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित व्यक्ती बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना दि. १७ रोजी वळती येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाला. रविवारी तो मुंबई येथून वळती येथे आला होता.तालुक्यात आत्तापर्यंत कोरोना बाधित व्यक्ती ४५  सापडले होते. त्यापैकी ४१ रुग्णांना घरी पाठवण्यात आले.  एक रुग्ण मयत आहे. तर तीन बाधित व्यक्तींवर उपचार चालू आहेत त्यातील एक रुग्ण भीमाशंकर हॉस्पिटल मंचर व दोन पुणे येथे उपचार चालू आहे. तसेच दि. १७ रोजी कोंढरे व सुपेधर महाळुंगे येथील तीस संशयितांचे स्वॅप तपासणीसाठी पुणे येथे पाठवले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.तालुक्यातील १७ कोरोना बाधित गावांपैकी १३ गावे सद्यस्थितीत कोरोना मुक्त झाली आहे. तरीही नागरीकांनी काळजी घ्यावी, विनाकारण फिरू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.