दुसऱ्यांदा लागलेली आग नियंत्रणात; सात जणांन वाचवण्यात यश

गुरुवारी दुपारी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेली आग आटोक्यात आल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास टर्मिनल एक या इमारतीत पुन्हा आग लागली. ही आग नियंत्रणात आल्याची  माहिती अग्नीशामक दलाने दिली आहे. यावेळी इमारतीत अडकलेल्या सात जवानांना वाचवण्यात यश आले आहे.

पुणे:  गुरुवारी दुपारी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेली आग आटोक्यात आल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास टर्मिनल एक या इमारतीत पुन्हा आग लागली. ही आग नियंत्रणात आल्याची  माहिती अग्नीशामक दलाने दिली आहे. यावेळी इमारतीत अडकलेल्या सात जवानांना वाचवण्यात यश आले आहे.

इन्स्टिट्यूटमध्ये दुपारी २ च्या सुमारास लागलेल्या आगीत एकूण पाच मजुरांचा मृत्यू झाला आहे. रामा शंकर हरीजन, बिपीन सराेज, सुशीलकुमार पांडे, महेंद्र इंगळे, प्रतिक पास्ते अशी मृतमुखी पडलेल्या कामगारांची नावे असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे.हे मृत्यू मुखी पडलेले सर्व मजूर हे कंत्राटी कामगार होते. हे सर्वजण वेल्डिंगच्या काम करत होते.