पुण्याच्या रस्त्यावर रान गव्याची प्रतिकृती! – गिरीश मुरुडकर यांची संवेदनशीलता

मुरुडकर झेंडेवाले या पासोड्या विठोबाजवळील दुकानात ही प्रतिकृती उभारली आहे. 'घटनेचे गांभीर्य ओळखुया,निसर्गात ढवळाढवळ थांबवूया'असा शोकसंतप्त संदेश भारत फ्लॅग फाउंडेशनने या प्रतिकृती जवळ लावला आहे .

  • 'आम्हाला माफ कर ,आम्ही तुझे गुन्हेगार आहोत' असे म्हणत, पुणेकरांनी मागतील मृत रानगव्याची माफी

पुणे : माणसांच्या जंगलात प्राण गमावलेल्या गव्याची माफी मागणारे बॅनर पुण्याच्या रस्त्यावर लागले असून पुण्याच्या रस्त्यावर रान गव्याची प्रतिकृती उभारली आहे . मुरुडकर झेंडेवाले म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीश मुरुडकर यांच्या उपक्रमातून पुणेकरांची संवेदशीलता व्यक्त झाली आहे !

भारत फ्लॅग फाउंडेशन चे अध्यक्ष गिरीश मुरुडकर यांनी मुरुडकर झेंडेवाले या पासोड्या विठोबाजवळील दुकानात ही प्रतिकृती उभारली आहे. ‘घटनेचे गांभीर्य ओळखुया,निसर्गात ढवळाढवळ थांबवूया’असा शोकसंतप्त संदेश भारत फ्लॅग फाउंडेशनने या प्रतिकृती जवळ लावला आहे . पुणेकरांची नजरा ही प्रतिकृती वेधून घेत आहे . बुधवारी कोथरूडमध्ये रानगव्याने माणसांच्या गर्दीला,पाठलागाला घाबरून प्राण गमावल्यावर हळहळ व्यक्त झाली होती . आज ‘आम्हाला माफ कर ,आम्ही तुझे गुन्हेगार आहोत ‘ असे शब्द लिहिलेले बॅनर लावून मुरुडकर यांनी पुणेकरांच्या भावना व्यक्त केल्या आहेत . ‘जंगले राखुया ,वन्यजीव जगवूया’ असा संदेशही गिरीश मुरुडकर यांनी प्रतिकृती जवळ लिहिला आहे.