पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठ्याप्रमाणात घट; जाणून घ्या आजची आकडेवारी

पुण्यात आज दिवसभरात २४६ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात ३५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे २१ जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. यामध्ये ११ जण पुण्याबाहेरील होते.

    पुणे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेले पुण्यात आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने दुसऱ्या लाटे दरम्यान लागू केलेल्या सक्तीच्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या रुग्ण संख्येवरून दिसत आहे.

    पुण्यात आज दिवसभरात २४६ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात ३५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे २१ जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. यामध्ये ११ जण पुण्याबाहेरील होते.

    पुण्यात सध्या ४८३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या४,७४,५४५ इतकी आहे. तर पुण्यात २७७३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण ८४९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत ४,६३, २८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज ४७४८ जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.