पाझर तलावातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात पंधरा दिवसापुर्वी झालेल्या अवकाळी पावसाने तेरुंगण येथील पाझर तलावातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

 पाण्याचा प्रश्न सुटण्यास काही प्रमाणात मदत होणार

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात पंधरा दिवसापुर्वी झालेल्या अवकाळी पावसाने तेरुंगण येथील पाझर तलावातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे.त्यामुळे श्रीक्षेत्र भीमाशंकर, म्हतारबाचीवाडी, तेरुंगण,निगडाळे, ढगेवाडी येथील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास काही प्रमाणात मदत होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरासाठी वरदान ठरलेल्या तेरुंगण येथील पाझर तलावात पाण्याची पातळी कमी झाली होती.त्यामुळे परिसरात पाणीटंचाई जाणवत होती. झालेल्या अवकाळी पावसाने तेरुंगण येथील पाझर तलावातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे परिसरातील पाण्याचा प्रश्न काही दिवसांसाठी तरी सुटला आहे. तेरुंगण येथील पाझर तलावामुळे म्हतारबाचीवाडी, तेरुंगण,निगडाळे, भीमाशंकर, ढगेवाडी इत्यादी गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने पाझर तलाव या भागातील नागरिकांसाठी  वरदान ठरला आहे. तसेच उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होत आहे. येथील पाण्याचा वापर  शासकीय भक्तनिवास येथेही केला जात आहे. म्हतारबाचीवाडी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातून या भागातील गावांना पाईप लाईनद्वारे पाणी पुरवले जाते.पाझर तलावाची पाणी साठवणक्षमता वाढविण्यासाठी तलावातील गाळ जलसंपदा  विभागाकडून काढण्यात यावा,अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहे.