दोन अधिकारी अन १५ कर्मचाऱ्यांच पथक राणेंना अटक करण्यासाठी रवाना मात्र न्यायालयाच्या आदेशा नंतर पुढील कारवाई ठरणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल होताच पुणे पोलिसांचे पथक अटक करण्यासाठी रवाना झाले असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या पथकात दोन पोलीस अधिकारी व 15 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान न्यायालयाचे कामकाज 10 नंतर सुरू होते. त्यानंतर पुणे पोलीस राणे यांच्या अटकेचे वॉरंट घेणार आहे. त्यासाठी पुणे पोलीस न्यायालयात अटकेसाठी अर्ज करतील. पण, न्यायालय आदेश काय देईल, त्यावर पुणे पोलिसांच्या तपासाची दिशा ठरणार आहे. 

  पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याने भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर राणे यांना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांच दोन अधिकारी आणि 15 कर्मचाऱ्यांच पथक चिपळूणला रवाना देखील झाले असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर पुणे पोलिसांची पुढील दिशा ठरणार आहे. न्यायालयाने अटकेचे आदेश दिले तर अटक करता येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

  पुण्यातील चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्यावर भादवी कलम 153 व 505 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शिवसैनिक रोहित कदम यांनी तक्रार दिली आहे.

  भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी उल्लेख करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाष्य केले. त्यानंतर मात्र राणे व शिवसेनेत वाद सुरू झाला आहे.

  दरम्यान शिवसैनिकानी तक्रारी दिल्यानंतर राणे यांच्यावर नाशिक शहरात पहिली तक्रार दाखल झाली. त्यानंतर महाड आणि आता तिसरी तक्रार पुण्यात दाखल झाली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले आहे.