हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ

बेल्हे: कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे परिसरात गोरगरिबांना अक्षरश: उपाशीपोटी राहावे लागत आहे. काम करायची इच्छा असली तरीही घरात बसून राहावे लागलेल्या हातावर पोट असणाऱ्या लोकांचे जगण्याचे वांदे झाले आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या या लोकांना पोटाला चिमटा लावूनच दिवस काढावे लागत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एप्रिल महिन्यापासून लॉकडाऊन आहे.त्याच्या आधी देखील अधून मधून दुकाने बंद राहिली होती. गर्दीच्या ठिकाणी तसेच बँका, पतसंस्था, सरकारी कार्यालय, सहकारी कार्यालय तसेच बाजारपेठांमध्ये चहा, वडापावच्या टपऱ्या चालवून आपला उदरनिर्वाह चालवतात. पहिल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे या लोकांचे हात बांधून पडलेले आहेत, यापैकी काहींनी अजून मधून घरपोच सेवा देण्याचा प्रयत्न केला; पण मात्र त्यांच्याजवळ कोरोनाच्या काळात व्यवसाय बंद पडले. आता जिल्हाधिकाऱ्यांनी लाकडांमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली असून,हॉटेल रेस्टॉरंटमधील पदार्थ घरपोच मिळणार आहेत.मात्र,आता चहाच्या तसेच वडापावच्या टपऱ्या  चालू करायच्या कशा? याबाबत संभ्रमावस्था असल्याने हे व्यवसाय अजूनही सुरू झालेले नाहीत.जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट आदेश दिले तर सर्वसामान्य लोकांना आपला उदरनिर्वाह चालवतात येऊ शकेल. जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल आणि रेस्टॉरंटमधून बनलेले पदार्थ घरपोच देण्यासाठी परवानगी दिलेली आहे. मोठ्या हॉटेल व्यावसायिकांकडे सर्व यंत्रणा असते. आमच्याकडे केवळ चहा पिण्यासाठी लोक येतात. आता हा गाडा बंद राहिल्याने कुटुंबात कसे चालवायचे हा प्रश्न आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी चहाच्या टपऱ्यांना देखील सुरू करण्यास परवानगी द्यावी.