‘तिच्या’ जन्माचे जंगी स्वागत

काटेवाडी: समाजात कायम दुय्यम स्थान मिळणाऱ्या स्त्रीचा जन्म होताच तिला गर्भातच संपवण्याच्या अनेक घटना ऐकायला व‌‌ पाहायला मिळत आहेत, मात्र बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील काटे परिवाराने बेटी बचाव बेटी पढाव ही उक्ती सार्थ करत मंगळवारी (दि.२७ रोजी ) नातीचे फुलांच्या पायघड्या घालून आनंदोत्सव साजरा करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे .

चूल आणि मूल एवढ्यापुरती मर्यादित ठेवून स्त्रियांना कायम दुय्यम  स्थान दिले गेले आहे . स्त्रीगर्भ  असल्याचे समजताच गर्भातच तिला संपवण्याच्या अनेक घटना पुरोगामी महाराष्ट्रात घडत आहेत ,पण या व्यवस्थेला फाटा देऊन काटेवाडी येथील प्रगतशील शेतकरी दतात्रय जितोबा काटे यांनी स्त्री जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले आहे . काटे यांच्या सुनबाई तृप्ती निखील काटे यांनी (१९ ऑक्टोबर )   बारामती येथील एका खाजगी रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला .मुलीच्या जन्मानंतर काटे परिवाराने स्त्रीजन्माचे स्वागत   केले .समाजातील प्रत्येकाने स्त्रीजन्माचे स्वागत करावे ,यासाठी अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला पण सुनबाई व नात बारामती येथील रुग्णालयात होत्या, दहा दिवसानी त्या घरी येणार होत्या, त्यामुळे घरात आंनदाचे वातावरण होते. लहान थोरांसह सर्वजण मुलीच्या स्वागताची तयारी करण्यात मग्न होते . नात  व सुन येणार असल्याने सणाप्रमाणेच धावपळ होती . प्रत्येक जण घरामध्ये सर्वत्र सजावट करून फुगे व फुलांचे तोरण बांधून स्वागताची तयारी करत होते. मुलीच्या जन्मानंतर सुन तृप्ती चे नाती सह मंगळवारी दिनांक २७ रोजी काटेवाडी येथे आगमन झाले .काटे परिवारातर्फे  आजोबा विजय चंद्रकात काटे यांनी आतिषबाजी करून स्वागत केले.  एवढ्यावर न थांबता त्यानंतर सुनेसह नातीचे पांरपारिक पद्धतीने आजी  वैशाली व संध्या काटे यांनी औक्षण केले .  गृहप्रवेश देण्यात आला . घरामध्ये मुलींच्या नावाने गाणे लावत या मायलेकींचे स्वागत करून फटाक्यांची आतीषबाजी करत दिवाळी साजरी केली.