गांजा बाळगणारा तरुण गजाआड, सव्वाचार किलो गांजा जप्त

अनिकेतची झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या बॅगमधील पांढऱ्या  पिशवीत ४ किलो ३३८ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी ९० हजार रुपयांचा गांजा जप्त केला.

    पिंपरी: थोडा थोडका नव्हे तब्ब्ल ४ किलो ३३८ ग्रॅम गांजा बाळगल्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. प्रकरणी भोसरी पोलिसांनी कासारवाडी रेल्वे स्टेशनजवळ ही कारवाई केली आहे. अनिकेत महादेव सरापे (वय २३, रा. मोहननगर, धनकवडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस शिपाई समीर रासकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ पिंपरीकडे जाणाऱ्या   रस्त्यालगत एक तरुण संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे असलेल्या पिशवीमध्ये गांजा असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी कारवाई करत अनिकेत याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या बॅगमधील पांढऱ्या  पिशवीत ४ किलो ३३८ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी ९० हजार रुपयांचा गांजा जप्त केला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.