खाणीत गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

वाघोली : वाघोली येथील शिंदे-अगरवाल खाण परिसरामध्ये गणपती विसर्जनासाठी गेलेल्या बाईफ रोड येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.१) दुपारी दोनच्या सुमारास घडली. कृष्णा मारुती लोकरे (वय १८, रा. वाघोली) असे खाणीत बुडून मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लोकरे त्याच्या सोबत असलेल्या काही जणांसोबत शिंदे-अगरवाल खाणीमध्ये गणपती विसर्जनासाठी गेला होता. तेथे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. लोणीकंद पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटलला हलविण्यात आला. गणपती विसर्जनासाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.