पैशांवरून चिकन विक्रेत्याचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; बोपोडीतील घटना

पैशांवरून एका तरुण चिकन विक्रेत्याचा चौघांनी कोयत्याने वार व फरशी डोक्यात घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.

    पुणे : पैशांवरून एका तरुण चिकन विक्रेत्याचा चौघांनी कोयत्याने वार व फरशी डोक्यात घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील बोपोडीत दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी चौघांना पकडले आहे.

    मॉन्टी परदेशी (वय 26, रा. खडकी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी याचे बोपोडीत चिकन दुकान आहे. आरोपी परदेशीच्या ओळखीतले होते. दरम्यान त्यांच्यात पैशावरून वाद झाला होता. या रागातून आरोपींनी बोपोडी भागात सुरू असलेल्या मेट्रोचे कामाच्या ठिकाणी परदेशीला गाठले.

    तसेच डोक्यात कोयत्याने वार केले. तर डोक्यात फरशी घालून खून केला. या घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिस व गुन्हे शाखेच्या युनिट चारने येथे धाव घेतली. खडकी पोलिसांनी पसार झालेल्या चौघांना पकडले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याचे खडकी पोलिसांनी सांगितले आहे.