बहिणीशी बोलण्याच्या कारणावरून हत्या करणारे आरोपी अटकेत

    पिंपरी : चाकणमधील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना बुधवारी (दि. 8) अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. मुलीची छेड काढल्यानंतर चिडलेल्या तरुणांनी हा खून केल्याची बाब तपासात समोर आली आहे.

    रोहित प्रभू सहानी (वय 16, रा.चाकण) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी (दि. 6) दुपारी एकच्या सुमारास रोहितची हत्या करण्यात आली. याबाबत त्याच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला हुजेफा असिफ काकर यास अटक केली होती. त्यानंतर निहाल सलीम इनामदार, मन्सूर नसरुद्दिन इनामदार, सोहेल राजू इनामदार यांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने अराफत वाजिब सिकीलकर व दोन अल्पवयीन मुलांना (सर्व रा.चाकण) ताब्यात घेतले.

    मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून या सर्वांनी मिळून रोहित सहानी याचे अपहरण केले होते. त्यानंतर त्याला लाथाबुक्क्यांनी लोखंडी रॉडने मारहाण करून व डोक्यात दगड घालून खून केला होता. या प्रकरणी आरोपी अटकेत आहेत.