पाहा  VEDIO अबब…  आंबाच्या पेटीला मिळाला इतका भाव; हंगामातील आंब्याच्या पहील्या पेटीचे आगमन

पुण्यातील बाजारातही आंब्याच्या पेटीची आवक झाली. कुणकेश्वर येथील रामभाऊ सावंत या आंबा उत्पादकाकडून ही पेटी पुण्यातील फळांच्या घाऊक बाजारात ही पेटी पाठविण्यात आली हाेती. व्यापारी बापू भाेसले यांच्या गाळ्यावर ही पेटी विक्रीसाठी ठेवली गेली. बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या हस्ते या पेटीचे पुजन केले गेले. त्यानंतर पेढे वाटप करून पेटीचा लिलाव केला गेला.

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात या हंगामातील आंब्याच्या पहील्या पेटीचे आगमन रविवारी झाले. पाच डझनाच्या पेटीला पंचवीस हजार रुपये भाव मिळाला. आंब्याची नियमित आवक सुरू हाेण्यापुर्वीच बाजारात मुहुर्तावर काही व्यापारी आंब्याची आवक करीत असतात. नुकतेच मुंबईतील बाजारात आंब्याची पेटीची आवक झाली हाेती. आता पुण्यातील बाजारातही आंब्याच्या पेटीची आवक झाली. कुणकेश्वर येथील रामभाऊ सावंत या आंबा उत्पादकाकडून ही पेटी पुण्यातील फळांच्या घाऊक बाजारात ही पेटी पाठविण्यात आली हाेती. व्यापारी बापू भाेसले यांच्या गाळ्यावर ही पेटी विक्रीसाठी ठेवली गेली. बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या हस्ते या पेटीचे पुजन केले गेले. त्यानंतर पेढे वाटप करून पेटीचा लिलाव केला गेला.

बाजारातील व्यापारी रावसाहेब कुंजीर यांनी लिलावात ही पेटी पंचवीस हजार रुपयांना खरेदी केली. यावेळी बाजारातील व्यापारी गणेश घुले, युवराज काची आदी व्यापारी उपस्थित हाेते.  व्यापारी भाेसले म्हणाले, ‘‘ पुण्यात साधारणपणे जानेवारी महीन्यात आंब्याची पहीली पेटी येत असते. प्रत्यक्षात आंब्याचा नियमित हंगाम हा मार्च महीन्याच्या पहील्या आठवड्यात सुरू हाेईल. फेब्रुवारी महीन्यात तुरळक आवक सुरू असेल. सुरवातीच्या काळात आंब्याला चांगला भाव मिळताे.’’