वाघोलीतील भैरवनाथ तलावात मुबलक पाणीसाठा

वाघोली : वाघोलीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या भैरवनाथ तलावात यावर्षी मुबलक पाणीसाठा झाला आहे. तलावाची खोली काही ठिकाणी पंधरा तर काही ठिकाणी तीस फूट झाली असल्याने या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला असून हा तलाव ओसंडून वाहत आहे. पीएमआरडीए च्या माध्यमातून या तलावा मधील गाळ काढून खोलीकरण करुन तलावाच्या सर्वच बाजुंनी या मातीचा भराव केला आहे. काही ठिकाणी काँक्रीट भिंत कंपाउंड वॉलचे काम केले गेले आहे तर जॉगिंग ट्रॅकचे व ग्राउंडचे काम बाकी आहे.  तलावाचे खोलीकरण केल्याने मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे २००७ नंतर २०१९ आणि २०२० ला हा तलाव पूर्ण भरला असून दरवर्षी पेक्षा तीस पट अधिक पाणी साठा उपलब्ध झाला आहे. पाणी साठा वाढल्याने गावातील शेतकऱ्याच्या विहिरीला, हाउसिंग सोसायटी बोरला आणि गावातील ग्रामस्थांच्या बोरला पाणी वाढले आहे. यामुळे पाण्यावर होणार खर्च अनेकांचा वाचला आहे. गावातील नागरिकांना पाणी वापरण्यासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
– तलावांचे सुशोभीकरण होणार
भैरवनाथ तलावाच्या पूर्ण साईटने कंपाउंड वॉल उभारणार येणार असून भविष्यात ओसंडून वाहणाऱ्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी धोबीघाट तसेच सर्वच बाजुंनी जॉगिंग ट्रॅक आणि गार्डन ग्रामपंचायतच्या माध्यमातून उभारणार येणार आहे असे वाघोली चे माजी उपसरपंच रामकृष्ण सातव पाटील यांनी सांगितले. वाघोली व परिसरातील घाण पाणी आणि तलावातून वाहणारे पाणी यासाठी तलावाच्या खालच्या बाजूला एसटीपी प्लांट उभारले जाणार असून त्या मधून  स्वच्छ झालेले पाणी परिसरातील शेतकऱ्यांना आणि त्या तलावाच्या संरक्षक भिंतीलगत उभारलेल्या गार्डनला देण्यात येणार आहे. या उर्वरित कामासाठी साठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी रामकृष्ण सातव व अनिल सातव यांनी केली होती, या मागणीनुसार अंदाज पत्रक तयार झाले असून या कामाच्या निधीसाठी पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे यांनी सहमती दर्शवली आहे. यामुळे वाघोलीत तलावांचे सुशोभीकरण सुद्धा होणार असून ते झाल्या नंतर नागरिकांच्या वाफरासाठी ते खुले केले जाणार आहे.