स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत बाभूळमुक्त कर्जत अभियानास सुरुवात

कर्जत : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत बाभूळमुक्त कर्जत अभियान पै. प्रविण घुले मित्रमंडळ व युवक काँग्रेसकडून कर्जत शहरात राबविण्यात सुरूवात झाली आहे.

कर्जत : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत बाभूळमुक्त कर्जत अभियान पै. प्रविण घुले मित्रमंडळ व युवक काँग्रेसकडून कर्जत शहरात राबविण्यात सुरूवात झाली आहे. कर्जत शहरातील मोकळे प्लाॅट,पडके वाडे, जुनी घरे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाभळी उगवल्या असून या ठिकाणी कचरा साचला आहे. कर्जत शहराला स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नगरपंचायत विविध सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी रोज श्रमदान करून कचरा गोळा करतात परंतु मोकळया जागेवरील बाभळी मुळे त्यांना स्वच्छ परिसर करण्यासाठी अडचणी येत असल्याने नगरपंचायतींच्या वतीने मोकळया जागा मालकाला नोटीस बजावली असून आपली जागा स्वच्छ करण्यासाठी समज दिली आहे. जे जागा मालक आपली जागा स्वच्छ करणार नाहीत त्याच्या मिळकत उता-यावर नगरपंचायतीने स्वच्छ केल्यास तीनपट बोजा चढवणार असल्याने पै. प्रविण घुले मित्र मंडळाने लोकांची मदत करावी या उद्देशाने व गरीब गरजवंत मिळकत धारकांना आर्थिक भुर्दंड पडू नये म्हणून मोफत कर्जत शहरातील सर्व सार्वजनिक व वैयक्तिक मिळकत मधील बाभुळ मुक्त कर्जत अभियान सुरू केले आहे.
कर्जत शहरातील वार्ड क्रमांक ९ व १० मध्ये बाभुळ मुक्त अभियान सुरू करताना अमित तोरडमल व इतर कार्यकर्ते