Bribe

पिंपरी चिंचवड महापालिकेत ९ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणात पुणे लाच लुचपत विभागाने काही दिवसांपूर्वी कारवाई करत स्थायी समितीचे अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांच्यासह ५ जणांना दोन लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अटक केली होती. कारवाईदरम्यान लाच लुचपत विभागाला कार्यालयात काही पाकीट आणि रोख रक्कम देखील मिळाली होती.

    पुणे : पिंपरी चिंचवड पालिकेत झालेल्या त्या बहुचर्चित लाच प्रकरणात एसीबीकडून नगरसेवकांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून या नगरसेवकाना कार्यालयात बोलवून त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे. त्यांचे जबाब नोंदविले जात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

    पिंपरी चिंचवड महापालिकेत ९ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणात पुणे लाच लुचपत विभागाने काही दिवसांपूर्वी कारवाई करत स्थायी समितीचे अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांच्यासह ५ जणांना दोन लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अटक केली होती. कारवाईदरम्यान लाच लुचपत विभागाला कार्यालयात काही पाकीट आणि रोख रक्कम देखील मिळाली होती. त्या पाकिटावर काही नावे होती. त्यानुसार याप्रकरणात एसीबीने संबंधिताकडे चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. स्थायी समितीच्या सर्व नगरसेवकांना (समितीवर असलेले) चौकशीला बोलावले जात आहे. गेल्या चार दिवसांपासून ही चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर त्यांचे जबाब नोंदवले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचा राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. वर्क ऑर्डर काढण्यासाठी नऊ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यात २ लाख घेताना पकडले होते.