स्थायी समितीची बैठक संपताच ‘एसीबी’चा छापा ; ॲड. नितीन लांडगेसह पाच जणांना अटक

ॲड. नितीन लांडगे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायि सिमतीचे अध्यक्ष आहेत. तर, ज्ञानेश्वर पिंगळे हा लांडगे यांचा पीए आहे. तर, कांबळे व शिंदे हे क्लार्क आहेत. तर, आणखी एक खासगी व्यक्ती आहे. यात दोन तक्रारदार आहेत. त्यांना पालिकेचे टेंडर मिळाले होते. त्याची वर्क ऑर्डर काढण्यासाठी त्यांच्याकडे ९ लाखांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती.

    पुणे :  पिंपरी चिंचवड पालिकेच्या स्टँडीग कमीटीचे चेअरमन ॲड नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना एसीबीने २ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रात्री उशीरा अटक केली आहे. ९ लाखांची लाचेची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता स्विकारला होता. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे, क्लार्क अरविंद कांबळे, राजेंद्र शिंदे व आणखी एकाला पकडण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
    ॲड. नितीन लांडगे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायि सिमतीचे अध्यक्ष आहेत. तर, ज्ञानेश्वर पिंगळे हा लांडगे यांचा पीए आहे. तर, कांबळे व शिंदे हे क्लार्क आहेत. तर, आणखी एक खासगी व्यक्ती आहे. यात दोन तक्रारदार आहेत. त्यांना पालिकेचे टेंडर मिळाले होते. त्याची वर्क ऑर्डर काढण्यासाठी त्यांच्याकडे ९ लाखांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती.या तक्रारीची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, आज सायंकाळी तडजोडीअंती ९ लाखा पैकी पहिला हप्ता म्हणून २ लाख रुपयांची लाच घेताना त्यांना पकडण्यात आले. दरम्यान, प्रथम पीए ज्ञानेश्वर पिंगळे व क्लार्क यांना पकडले होते. त्यानंतर रात्री उशीरा लांडगे व इतर एकाला एसीबीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, एसीबीने स्थायी समितीच्या बैठकीनंतर पालिकेतच शिरून छापा कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.