पिंपरी चिंचवडनंतर एसीबीची पुणे पालिकेत कारवाई ; अभियंता ४० हजार घेताना जाळ्यात सापडला

तक्रारदार यांचे बिल मंजूर करायचे होते. त्यासाठीं सोनवणे यांनी प्रथम ३५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर सोनवणे यांनी ५० हजार रुपयांची मागितली. नंतर एसीबीने पडताळणी केल आणि आज सापळा कारवाई करताना ४० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे.

    पुणे : पिंपरी चिंचवडच्या पालिकेत एसीबीने दणका दिला असतानाच पुणे पालिकेच्या रस्ते उपअभियंत्याला ४० हजार रुपयांची लाच घेताना पकडले. या कारवाईने चांगलीच खळबळ उडाली आहे. सुधीर सोनवणे असे पकडलेल्या अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे बिल मंजूर करायचे होते. त्यासाठीं सोनवणे यांनी प्रथम ३५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर सोनवणे यांनी ५० हजार रुपयांची मागितली. नंतर एसीबीने पडताळणी केल आणि आज सापळा कारवाई करताना ४० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे.