आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात पावसाळी बाजरी काढणीला वेग

आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात पावसाळी बाजरी काढणीला वेग
मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापुर,लाखणगांव,पोंदेवाडी, लोणी,धामणी, खडकवाडी ,वाळुंजनगर, रानमळा येथील शेतकऱ्यांनी पावसाळी बाजरी काढणीची  कामे सुरु केली आहेत.पावसाळी बाजरीचे उत्पादन चांगले होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पावसाळी बाजरीचे पीक घेतले होते.बाजरीचे पीक काढणीला आले असून शेतकरी बाजरी काढण्यात व्यस्त आहेत. कोरोनामुळे  बाहेरील मजूर रोजगारासाठी मिळत नसल्याने  मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. साडेतीनशे रुपये मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनच्या काळात तरकारी पिकांना बाजारभाव नव्हते.त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजरीचे पीक घेतले होते. बाजरीचे पीक सध्या काढणीला आले असून शेतकऱ्यांनी बाजरी काढणी सुरु केली आहे. बाजरीचे पीक चांगले आले असुन यावर्षी बाजरीचे उत्पादन वाढणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.