पुण्यात नवले ब्रिजजवळ २० गाड्यांमध्ये विचित्र अपघात, एकाचा मृत्यू

पुणे-बंगळुरू महामार्गावरील ( Pune-Bangalore highway)  नवले ब्रिज जवळ भीषण अपघात झाला असून पाच ते सहा गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. तर  काही जखमी नागरिकांना जवळच्या रुग्णालयात केले दाखल केले आहेत. तसेच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पुणे-बंगळुरू महामार्गावरील ( Pune-Bangalore highway)  नवले ब्रिज जवळ भीषण अपघात झाला असून पाच ते सहा गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. तर  काही जखमी नागरिकांना जवळच्या रुग्णालयात केले दाखल केले आहेत. तसेच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात कात्रज ते नवले पूल दरम्यान ऑर्किड स्कुलजवळ मालवाहतूक ट्रेकचे नियंत्रण सुटले आणि पुढील वाहने एकमेकांना धडकली. त्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार  सुरू आहेत. या भीषण अपघातामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले असून यामध्ये दुचाकी आणि चारचाकींचा समावेश आहे. तर  जोरात धडकेमुले पीक अप टेम्पो बाजूच्या चारीत कोसळून पडला आहे.

मुंबई-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलाजवळ मंगळवारी सकाळी ११ वाजता भीषण अपघात झाला. ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने १० दुचाकी व ८ चारचाकी वाहनांना अक्षरश: चिरडले. त्यामध्ये प्राथमिक माहितीनुसार ४ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. मंगळवारी सकाळी अकरा वाजता मुंबई-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलावरुन देहुरोडच्या दिशेने एक ट्रक भरधाव चालला होता. त्याचवेळी ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर भरधाव ट्रकने रस्त्यावरुन जाणाऱ्या ८ ते १० दुचाकींना उडविले, तरीही ट्रक थांबला नाही, त्यापुढेही वेगात जाणाऱ्या ट्रकने ८ ते ९ चारचाकी वाहनांना ही उडविले. अंगावर थरकाप उडविणाऱ्या या अपघातानंतर एकच गोंधळ उडाला.

रस्त्याने जाणारे नागरिक आपला जीव वाचविण्यात धावू लागले, तर वाहनामधील नागरिकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला, तर किती जण जखमी झालेत, याची अद्याप मोजदाद झालेली नाही. या विचित्र व भीषण अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या नागरीकांच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरुन सोडला. दरम्यान, घटना घडल्यानंतर काही मिनिटातच भारती विद्यापीठ पोलिस व वाहतूक शाखेचे पोलिस, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी स्थानिक नागरीकांच्या मदतीने जखमींना मिळेल त्या वाहनामधून तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी हलविले. त्याचबरोबर मृतदेह रुग्णवाहीकेतुन रुग्णालयात पोचविण्यात आले. दरम्यान, पोलिसांकडुन अपघातातील मृत व्यक्ती व जखमी नागरीकांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. तसेच वाहतूक शाखेकडुन अपघातग्रस्त वाहने बाजूला काढत महामार्गवरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.