rohit pawar team accident

कर्जत: वादळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या आमदार रोहित पवार यांच्या ताफ्यातील सभापतींच्या गाडीला अपघात झाला.(accident of vehicle with mla rohit pawar team) ही घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली .

कर्जत तालुक्यातील राशीन परिसरासह परिटवाडी, खेड, बाभुळगाव दुमाला , भांबोरा या भागात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार रोहित पवार शुक्रवारी या भागाच्या दौऱ्यावर आले होते . दुपारी चार वाजता त्यांच्या ताफ्यातील सभापतींचे वाहन ( एम एच १६ / ६३०५ ) राशिन येथून भांबोरा येथे भरधाव वेगाने जात होते. अचानक गाय आडवी आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाला. अचानक गाडीचा वेग नियंत्रित करत असताना गाडीने पलटी घेतली व रस्त्याच्या खाली जाऊन कोसळली. यामध्ये चालक तात्या जाधव , तसेच पत्रकार विजय सोनवणे होते.

आमदार रोहित पवार यांच्या दौऱ्याचे  वार्तांकन करण्यासाठी पत्रकार विजय सोनवणे हे या दौऱ्यात होते व पत्रकार विजय सोनवणे हे पंचायत समितीच्या सभापतींच्या गाडीतून प्रवास करत होते. याच गाडीला अपघात झाला व या गाडीने दोन पलट्या खात फरफरडत जाऊन गाडी उलटी झाली. या गाडीतील पत्रकार विजय सोनवणे हे किरकोळ जखमी झाले तर चालक हेही किरकोळ जखमी झाले या दोघांनाही पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
किरकोळ जखमी झाले आहेत . मात्र या अपघातात गाय दगावली आहे .