मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरणातील आरोपीस बारामतीतून अटक

आरोपी हा चाणाक्ष, हुशार व उच्च शिक्षित असल्याने त्यास ताब्यात घेण्यासाठी यावेळी पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक नामदेव शिंदे, सहा पोलीस निरिक्षक मुकुंद पालवे,पोलीस अंमलदार नवनाथ शेंडगे व सचिन कोकणे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

    बारामती : मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या राजेश पांडे या आरोपीस बारामतीतून अटक करण्यात आली आहे.आरोपी पांडे यास बारामती पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बुधवारी रात्री बारामती शहरातील अमृता लॉज मधून अटक करण्यात आली आहे.मुंबई येथील गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी राजेश पांडे उर्फ राजेश दयाशंकर पांडे हा एका नामांकित हॉस्पिटल मध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणुन नोकरीस होता. त्याने व त्याचे साथीदारांनी मिळून भेसळ युक्‍त द्रव कोव्हीड १९ ची लस असल्याचे भासवून लोकांचा कॅम्प आयोजीत केला होता. सिल तुटलेल्या व्हॅक्सीन बाटल्या मधून भेसळयुक्त लस देवून लोकांची फसवणुक केली.

    लसीकरण केलेल्या लोकांना मुंबई मधील वेगवेगळया नामांकित हॉस्पिटलचे लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र पांडे याने देवून त्यांची फसवणुक केलेली आहे.त्यामुळे आरोपी पांडे अटक चुकविण्यासाठी,पोलीसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी पुणे शहर व परिसरात आल्याची माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंके यांनी दिली.त्यानंतर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी स्वत: पथक तयार केले. आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी हा बारामती शहरातील बारामती-भिगवण रोडवरील अमृता लॉज या ठिकाणी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.आरोपी हा चाणाक्ष, हुशार व उच्च शिक्षित असल्याने त्यास ताब्यात घेण्यासाठी यावेळी पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक नामदेव शिंदे, सहा पोलीस निरिक्षक मुकुंद पालवे,पोलीस अंमलदार नवनाथ शेंडगे व सचिन कोकणे यांनी कारवाईत सहभाग घेतला.