देवीच्या मंदिराचा कळस चोरणाऱ्या आरोपीस २ तासात अटक ;  शिरूर पोलिसांची कारवाई

कवठे येमाई : शिरूर येथील जागृत देवस्थान रेणुकामाता मंदिराचा कळस चोरून नेणाऱ्या आरोपीस पोलिसांनी मुद्देमालासह २ तासात अटक केल्याची माहिती शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली. याबाबत शिरूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दि. ६ रोजी रात्री ९.२५ वा सुमारास शिरुर येथील जागृत रेणुकामाता मंदीराचा कळस चोरी झाल्याची माहीती पोलिसांना मिळाली.त्यानुसार तात्काळ पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे ,पो कॉ राजेंद्र गोपाळे, पो.कॉ संतोष साळुंखे ,पो कॉ गोरक्षनाथ शिंदे असे तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. चोरी झाल्याची घटना खरी असल्याची माहीती त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक प्रविण खानापूुरे यांना दिल्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी पाहचले.सदर ठिकाणी अनिल गायकवाड व नितीन गाजरे यांनी कळस घेवून जाणा-या आरोपीला हटकले होते व त्याचेकडे चौकशी केली होती. त्यांनी दिलेल्या त्या जुजबी माहीतीवरून तपासाची चके फिरवुन कळस चोरून घेवुन जाणारा आरोपी प्रशांत आबा म्हरके रा बाबुरावनगर शिरूर ता शिरूर जि पुणे हा अराल्याचे निप्पन्न झाले.  परंतु तो त्याचे राहते घरी मिळुन आला नाही.आरोपी हा चोरलेला कळर घेवुन परत रेणुकामाता मंदीराकडे येत असल्याची माहीती मिळाल्याने अनिल गायकवाड, नितीन गाजरे व पेालीस निरीक्षक प्रविण खानापुरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे ,पो. ना संजु जाधव ,पो. कॉ राजेंद्र गोपाळे, पो. को संतोष साळुंखे, पो. कॉ गोरक्षनाथ शिंदे, पो ह.संतोष साठे. पो. कॉ राहुल भागवत यांनी सर्वानी मिळुन आरोपीस अंदाजे ४ ते ५ किले वजनाचा पंचधातुचा किंमत रु.२०,०००/- चा मुददेमालसह पकडुन तो कळस मंदीरामध्ये ठेवून आरोपी विरूध्द भादवि कलम 3७९ प्रमाणे शिरूर पेालीस स्टेशन येये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करून गुन्हा उघडकीस आणला. शिरूर पोलीस व शिरूर मधील जागरूक नाकरिकांनी तात्काळ केलेल्या प्रयत्नामुळे सदरचा गुन्हा हा फक्त दोन तासामध्ये उघडकीस आला आहे