दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर  उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे व पथक .
दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे व पथक .

बारामती : दुचाकी चोऱ्या करणाऱ्या विविध गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून ५ लाख १० हजार रुपये किमतीच्या एकुण ८ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. ज्ञानेश्वर बापू चव्हाण (रा.शेरे शिंदेवाडी ,ता.फलटण.जि.सातारा ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.या आरोपीवर यापुर्वी दरोडा,जबरी चोरी,मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हेशोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांनी दिली.

मागील अनेक महिन्यापासून बारामती तालुुका पोलीस ठाण्याच्या हददीतून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत गुन्हेशोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांना दिली होती. त्या पार्श्वभूमीवर योगेश लंगुटे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संशयित इसम ज्ञानेश्वर बापू चव्हाण ( रा.शेरे शिंदेवाडी ,ता.फलटण.जि.सातारा ) याला फलटणहून ताब्यात घेवून त्याची कसून चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान त्याने चोऱ्या केल्या असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून बारामती तालुका पोलीस ठाणे,फलटण ग्रामिण पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या पल्सर, युनिकाॅर्न, अपाईची ,स्पलेंडर कंपनीच्या अंदाजे ५ लाख १० हजार रुपयांच्या एकुण ८ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. तर त्यापैकी ३ दुचाकी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून, ५ दुचाकी मालकांचा शोध सुरू असल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.

सदर गुन्ह्यातील मिळून आलेल्या पाच दुचाकी ज्यांच्या मालकीच्या असतील त्यांनी बारामतीत तालुका पोलीस पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन बारामती तालुका पोलिसांनी केले आहे.सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेष ढवाण, सहायकपोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार जयंत ताकवणे, दत्तात्रय सोननिस ,काॅन्टेबल विनोद लोखंडे, नंदू जाधव, मंगेश कांबळे, संतोष मखरे, प्रशांत राउत यांनी केली आहे.