आरोपींना पाच जूनपर्यंत कोठडी

पुणे : येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटका झालेल्या गुन्हेगाराचा त्याच रात्री पाठलाग करून कोयत्याने निर्घृण खून केल्याप्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली असून, चार अल्पवयीन मुलांना ताब्यात

पुणे  : येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटका झालेल्या गुन्हेगाराचा त्याच रात्री पाठलाग करून कोयत्याने निर्घृण खून केल्याप्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली असून, चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. कोर्टाने आरोपींना ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रविवारी यातील आणखी दोघांना अटक करण्यात आल्याने आरोपींची संख्या अकरा झाली आहे. नितीन शिवाजी कसबे (वय २४, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याचा बुधवारी रात्री खून झाला होता. पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख, गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.