नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां २१२ जणांवर कारवाई

गर्दी होणार नाही, सुरक्षित अंतर राखले जाईल आणि कोरोनाचा वाढता प्रसार रोखला जाईल यासाठी पुन्हा काही प्रमाणात निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांनी देखील नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम पुन्हा सुरू केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत काल शनिवारी २१२ जणांवर कारवाई करण्यात आली .

    पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने निर्बंधांची नव्याने नियमावली जाहीर केली आहे. गर्दी होणार नाही, सुरक्षित अंतर राखले जाईल आणि कोरोनाचा वाढता प्रसार रोखला जाईल यासाठी पुन्हा काही प्रमाणात निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांनी देखील नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम पुन्हा सुरू केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत काल शनिवारी २१२ जणांवर कारवाई करण्यात आली .

    कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित अंतर राखणे हे निर्बंध पुन्हा एकदा कठोर करण्यात आले आहेत. रेल्वे, बस प्रवासानंतर सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ कोरोनाची चाचणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.

    पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी देखील शहरात नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाईचे आदेश प्रशासनाला दिलेत. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कारवाईची ही मोहीम मागील काही दिवसांपासून थंड पडली होती. काल शनिवारी एकाच दिवशी २१२ जणांवर कारवाई करण्यात आली .

    शनिवारी केलेली कारवाई 

    एमआयडीसी भोसरी (११), भोसरी (६), पिंपरी (९), चिंचवड (५२), निगडी (२२), आळंदी (१७), चाकण (१३), दिघी (४), म्हाळुंगे चौकी (२६), सांगवी (७), वाकड (१४), हिंजवडी (५), देहूरोड (१२), तळेगाव दाभाडे (०), तळेगाव एमआयडीसी (१३), चिखली (०), रावेत चौकी (०), शिरगाव चौकी (१)