पुण्यातील पेठांमधील ३३ धोकादायक वाड्यांवर कारवाई ; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकदायक वाड्यांची पाहणी

शहरातील कसबा पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, सदाशिव आणि नवी पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ, घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, गंज पेठ नाना पेठ, गणेश पेठ आशा विविध पेठांमध्ये चौरसाकृती आणि आयाताकृती शेकडो वाडे आहेत.

    पुणे : महापालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध पेठांमधील ३३ धोकादायक वाड्यांवर कारवाई केली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या परवानगीने महापालिका प्रशासनाने गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात १२ वाड्यांवर कारवाई केली.
    पुण्यातील वाडा संस्कृतीला एक इतिहास आहे. बहुतेक वाडे दोन ते तीन मजली असून वाड्यामध्ये मोकळे आंगण हे पुण्यातील वाड्यांचे वैशिष्ट्ये आहे.

    शहरातील कसबा पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, सदाशिव आणि नवी पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ, घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, गंज पेठ नाना पेठ, गणेश पेठ आशा विविध पेठांमध्ये चौरसाकृती आणि आयाताकृती शेकडो वाडे आहेत. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेवून महापालिकेने अत्यंत धोकादायक (सी -१), दुरुस्ती आवश्यक (सी -२), रिक्त न करता दुरुस्ती योग्य (सी-२) अशी वाड्यांची वर्गवारी केली आहे. या वर्गवारीनुसार सी १ मध्ये ०४, सी २ मध्ये २१४, सी ३ मध्ये ११५ वाड्यांचा समावेश आहे. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकदायक वाड्यांची पाहणी केली जाते. धोकदायकवाड्यांना इमारती खाली करण्याच्या नोटीसा दिल्या होत्या. त्यानंतर 33 धोकादायक वाड्यांवर कारवाई केली.