नियमभंग करणाऱ्या ३३६ जणांवर कारवाई

पिंपरी : प्रशासनाने दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत नियमभंग करणाऱ्या ३३६ जणांवर गुरुवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

पिंपरी : प्रशासनाने दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत नियमभंग करणाऱ्या ३३६ जणांवर गुरुवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात त्यात काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. तरीही नागरिकांकडून प्रशासनाचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून अशा नागरिकांवर कारवाई केली जात आहे. गुरुवारी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम १८८ प्रमाणे एमआयडीसी भोसरी (१७), भोसरी (११), पिंपरी (७३), चिंचवड (३३), निगडी (१६), आळंदी (९), चाकण (१०), दिघी (१३), म्हाळुंगे चौकी (२), सांगवी (३), वाकड (४९), हिंजवडी (२४), देहूरोड (२१), तळेगाव दाभाडे (२), तळेगाव एमआयडीसी (४), चिखली (४१), रावेत चौकी (७), शिरगाव चौकी (१) एकूण ३३६ जणांवर कारवाई केली आहे.