मास्क न वापरणाऱ्या ९ जणांवर कारवाई

पारगाव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तोंडाला मास्क बांधणे कायदेशीर बंधनकारक असताना मास्कचा वापर न करता विनाकारण फिरणाऱ्यांवर दौंड तालुक्यातील पारगाव मधील ९ जणांवर दंडात्मक कारवाई सोमवारी(दि.२९) ग्रामपंचायत व पोलीस यांनी संयुक्त कारवाई केली आहे.

 ग्रामपंचायतने अनेकांना ठोठावला ५०० रुपये दंड

पारगाव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तोंडाला मास्क बांधणे कायदेशीर बंधनकारक असताना मास्कचा वापर न करता विनाकारण फिरणाऱ्यांवर दौंड तालुक्यातील पारगाव मधील ९ जणांवर दंडात्मक कारवाई सोमवारी(दि.२९) ग्रामपंचायत व पोलीस यांनी संयुक्त कारवाई केली आहे.
पारगाव येथील तोंडाला मास्क न घातलेल्या व्यक्तींकडून पाचशे रुपये प्रमाणे दंड आकारत सुमारे ९ लोकांकडून ४ हजार ५०० रुपये एवढा दंड कारवाई करत वसूल केला आहे,अशी माहिती पोलीस हवालदार जितेंद्र पानसरे व ग्रामपंचायत उपसरपंच हनुमंत वसव यांनी दिली आहे. दौंड तालुक्यातील पाटस,वरवंड,बोरीपार्धी,केडगाव, खुटबाव यासह ग्रामीण भागात संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.यास आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे, त्यामुळे आज केलेल्या कारवाईचे स्थानिक आरोग्य विभाग व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. अशीच कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.