रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्यांवर पुण्यात कारवाई ; कर्वे रस्त्यावर पोलिसांनी केली दाेन जणांना अटक

Action against black marketeers of Remdesivir in Pune; Police arrest Dane on Karve road

    पुणे : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करण्याविरुद्ध पोलिसांची जाेरदार माेहीम सुरू आहे. कर्वे रस्त्यावर पोलिसांनी कारवाई करून दाेन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून तीन इंजेक्शन जप्त केले आहेत. राहुल सुनील खाडे (वय २२ रा, सुतार चाळ, पठारे वस्ती ), विजयराज दिनकर पाटील (वय ३१ रा. वडगांव शेरी ) असे अटक आराेपींची नावे आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, हे दाेघे कर्वे रस्त्यावरील एका हाॅस्पिटलच्या जवळ रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार पोलिसांनी गरवारे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमाेर जाऊन पाहणी केली. तेव्हा हे दाेघे संशयास्पदरित्या आढळून आले हाेते. त्यांच्याकडे चाैकशी केल्यानंतर झडती घेण्यात आली. त्यांच्याकडे तीन रेमडेसिवीर इंजेक्शन मिळून आले. त्याची ते प्रत्येकी सत्तर हजार रुपयांना विक्री करणार हाेते. त्यांच्याकडे औषध विक्रीचा परवानाही नसल्याचे आढळून आले. त्यांच्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात फसवणुक,औषध किमंत नियंत्रण आदेश, जीवनावश्यक वस्तु कायदा, औषधे व साैंदर्य प्रसाधने कायद्यानुसार गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. त्यांच्यािवरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी जयश्री सवदत्ती यांनी फिर्याद दिली आहे. या दाेन्ही आराेपींना न्यायालयाने २७ एपि्रलपर्यंत पोलीस काेठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सदर कारवाई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ ने केली आहे. आजपर्यंत पोलिसांनी रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध विविध पाेिलस ठाण्यात आठ गुन्हे दाखल केले असुन, यात १६ आराेपींना अटक केली असून, पंधरा इंजेक्शन जप्त केले आहेत.