रेमेडिसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई ; लोकल क्राईम ब्रँच’च्या पथकाने केली तिघांना अटक

स्थनिक गुन्हे अन्वेषण शाखेने दौंड (ता. दौंड), वारुळवाडी (नारायणगाव, ता.जुन्नर) या पुणे जिल्ह्यातील ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले. तपासाची दिशा निश्चित करून दौंड आणि वारुळवाडी शिवारात साफळा रचला. या दोन्ही ठिकाणी रेमेडिसीवर इंजेक्शन'ची काळ्या बाजाराने म्हणजेच शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने विक्री करणारे तिघे जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले

    नारायणगाव : पुणे जिल्ह्यात कोरोना उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमेडिसिवीर इंजेक्शनची काळ्याबाजाराने विक्री करीत असलेल्या तिघांच्या लोकल क्राईम ब्रँच’च्या पथकाने शनिवारी(दि.२४) रोजी दोन ठिकाणी छापा टाकून मुसक्या आवळल्या,असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यात ‘रेमेडिसिवीर इंजेक्शन्स’चा तुटवडा निर्माण झाल्यानंतर काळाबाजार होत असल्याची माहिती पुणे स्थानिक गुन्हे शाखेला समजली. त्यानुसार पुणे जिल्हा ग्रामीण अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना तपास केला.

    – १ लाख १९ हजार ७६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त
    स्थनिक गुन्हे अन्वेषण शाखेने दौंड (ता. दौंड), वारुळवाडी (नारायणगाव, ता.जुन्नर) या पुणे जिल्ह्यातील ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले. तपासाची दिशा निश्चित करून दौंड आणि वारुळवाडी शिवारात साफळा रचला. या दोन्ही ठिकाणी रेमेडिसीवर इंजेक्शन’ची काळ्या बाजाराने म्हणजेच शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने विक्री करणारे तिघे जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून १ लाख १९ हजार ७६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दौंड शहरातील इसम अक्षय राजेश सोनवणे (वय २४ वर्ष रा.गांधी चौक,विठ्ठल मंदिरामागे (ता.दौंड जि. पुणे) आणि सुरज संजय साबळे (वय २३)रा. शालिमार चौक) हे दोघे रेमेडिसीवर इंजेक्शन प्रत्येकी ३२,०००असे विक्री करीत असतांना लोकल क्राईम ब्रँच’च्या जाळ्यात अडकले. पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे, पोलिस उपनिरीक्षक अमोल गोरे, सहाय्यक फौजदार शब्बीर पठाण, पो. हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरू गायकवाड, मुकेश कदम, दत्ता तांबे, सागर चंद्रशेखर, काशीनाथ राजापूरे, पो. कौंस्टेबल दगडू वीरकर यांनी या कारवाईत भाग घेतला.