अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई; ६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत पोलिसांनी मंफ्रेन्ड मंडा (३० ), अनास्टाझिया डेव्हिड ( २६ ), हसन कासीद ( ३२ ), शामीम नंदादुला ( ३० ), बेका हमीस फाऊमी यांना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींच्या राहत्या घरातून कोकेन, मॅफेड्रोन, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजन काटे, प्लास्टिक पिशव्या, बॉटल ताब्यात घेण्यात आले.

    पुणे : शहरात काही परदेशी लोक कोकेन, ड्रग्स अशा अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत ६८ लाख ८६ हजार १०० रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा माल जप्त केला आहे.

    या कारवाईत पोलिसांनी मंफ्रेन्ड मंडा (३० ), अनास्टाझिया डेव्हिड ( २६ ), हसन कासीद ( ३२ ), शामीम नंदादुला ( ३० ), बेका हमीस फाऊमी यांना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींच्या राहत्या घरातून कोकेन, मॅफेड्रोन, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजन काटे, प्लास्टिक पिशव्या, बॉटल ताब्यात घेण्यात आले.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुर हिल्स सोसायटी उंड्री येथे पाच- सहा परदेशी लोक एकत्रित राहत होते. ते सर्व कोकेन, ड्रग्स अशा अंमली पदार्थाची विक्री करत असल्याचे खबऱ्यामार्फत समजले. याची दखल घेऊन अमली पदार्थ विरोधी पथकाने सोसायटीमध्ये कारवाई केली.