पाच जणांवर मोक्कांतर्गत कारवाई ; दहशत पसरवून लूट केल्याचे गुन्हे आहेत दाखल

गुन्ह्याच्या तपासादरम्यान टोळीप्रमुख ओंकार गुंजाळ याच्या नेतृत्वाखाली दहशत पसरवून टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर टोळीवर मोका अंतर्गत कारवाई होण्यासाठी युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी वरिष्ठांकडे प्रस्ताव सदर केला.

    लोणी काळभोर : पुणे शहर पोलिसांनी पाच जणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली. गुन्हे शाखा युनिट सहाने यासाठी पोलीस आयुक्तांना प्रस्ताव दिला होता. दहशत पसरवून लूट केल्याचे त्यांच्यावर गुन्हे आहेत. या कारवाई मुले लोणी कंद आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीला लगाम बसणार आहे.इशाप्पा उर्फ विशाल पंदी, प्रदिपउर्फ बाबू कोंढाळकर, ओंकार गुंजाळ, गणेश काळे, विजय राठोड असे मोका लावलेल्यांची नावे आहेत. एक महिन्यापूर्वी पुणे-नगर महामार्गावर वाघोलीतील उबाळेनगर परिसरामध्ये टेम्पो चालकाला कट मारल्याच्या बहाण्याने अडवून त्याच्याकडील साडे तेरा लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती.

    गुन्ह्याच्या तपासादरम्यान टोळीप्रमुख ओंकार गुंजाळ याच्या नेतृत्वाखाली दहशत पसरवून टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर टोळीवर मोका अंतर्गत कारवाई होण्यासाठी युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी वरिष्ठांकडे प्रस्ताव सदर केला. अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. स्थापनेनंतर गुन्हे शाखा युनिट सहाची पहिली मोक्का अंतर्गत कारवाई आहे. सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील, मच्छिंद्र वाळके, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश टिळेकर, सचिन पवार, शेखर काटे, नितीन मुंढे, प्रतिक लाहिगुडे, कानिफनाथ कारखिले, नितीन शिंदे, नितीन घाडगे, सुहास तांबेकर यांनी ही कामगिरी केली आहे.