अवैधरित्या गुटखा घेऊन जाणाऱ्यांवर कारवाई ; विमानतळ पोलिस तपास पथकाची कामगिरी 

विमानतळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी सचिन जाधव यांना माहिती मिळाली की, बोलेरो पिकअपमधून अवैधरित्या गुटखा वाहतूक होत आहे. त्यानुसार पथकाने मध्यरात्री नगर रस्त्यावर सापळा कारवाई करून २० लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे.

    पुणे :  विमानतळ पोलिसांच्या तपास पथकाने वेगवेगळ्या दोन कारवाया करत एक लुटमारीचा व दुसऱ्या कारवाईत अवैधरित्या गुटखा घेऊन जाणाऱ्यांना पकडले आहे. लोहगाव येथील पेट्रोल पंपाची रोकड चोरीप्रकरणात अनिकेत उर्फ दत्तात्रय बबन जाधव (वय १९, रा. गणेश पेठ) व रोहन जयदीप चव्हाण (वय १९, रा. मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
    शहरात अवैध प्रकार सुरू आहेत. त्याचवेळी गुटखाही तेजीत विक्री होत आहे. त्यामुळे गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस कारवाया करत आहेत. यादरम्यान विमानतळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी सचिन जाधव यांना माहिती मिळाली की, बोलेरो पिकअपमधून अवैधरित्या गुटखा वाहतूक होत आहे. त्यानुसार पथकाने मध्यरात्री नगर रस्त्यावर सापळा कारवाई करून २० लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. त्यात दोघांना अटक केली आहे. तर दोघांचा शोध घेतला जात आहे.
    तसेच दुसऱ्या कारवाईत धानोरी रोडवर साठे पेट्रोल पंपावर आरोपी दोघे रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास पेट्रोल टाकण्यासाठी आले होते. त्यांनी ४०० रुपयांचे पेट्रोल टाकले. पण, त्याचे पैसे दिले नाही. तसेच कोयत्याचा धाक दाखवून खिशातील १६ हजाराची रोकड चोरली होती.यागुन्ह्याचा तपास विमानतळ पोलीस करत होते. त्यावेळी कर्मचारी सचिन जाधव यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की, हा गुन्हा दोघांनी केला असल्याचे समजले. त्यानुसार विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, खंडणी विरोधी पथकाचे बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, विमानतळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन जाधव, कर्मचारी अशोक आटोळे, उमेश धेंडे, सचिन जाधव व पथकने केली आहे.