नियम धाब्यावर बसवत सिहंगडावर आलेल्या पर्यटकांवर कारवाई ; तब्बल ८८५०० हजारांचा  दंड केला वसूल

पावसाळा सुरु झाल्यामुळे अनेकजण सहली काढत आहेत. सिंहगड हा अशा लोकांसाठी जवळचा हॉट डेस्टिनेशन ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सिंहगडावर गर्दी करु नये, अशा सूचना पोलिसांकडून वारंवार करण्यात आल्या होत्या. तरीही नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने पुणे पोलिसांनी दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलले आहे.

    पुणे: कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर प्रशासनाने लॉकडाऊन नियमामध्ये शिथिलता आणली. मात्र अद्यापही अनेक पर्यटनस्थळे सरकाराकडून सुरु करण्यात आलेली नाहीत. मात्र नियम धाब्यावर बसवता अनेकजण पर्यटनस्थळी गर्दी करत आहेत. अशा अतिउत्साही पर्यटकांना पुणे पोलिसांनी चांगला दणका दिला आहे. पुण्यातील सिंहगडावर निर्बध कायम असतानाही नियमांचे उल्लंघन करून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून दोन दिवसात जवळपास ८८५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. पोलिसांनी शनिवार व रविवार या दोन दिवसात तब्बल १७७ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

    पावसाळा सुरु  झाल्यामुळे अनेकजण सहली काढत आहेत. सिंहगड हा अशा लोकांसाठी जवळचा हॉट डेस्टिनेशन ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सिंहगडावर गर्दी करु नये, अशा सूचना पोलिसांकडून वारंवार करण्यात आल्या होत्या. तरीही नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने पुणे पोलिसांनी दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलले आहे. खडकवासला धरण, सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे.

    मावळमध्ये वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकाचा पवना धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. शुभम दुधाळ असं या बुडालेल्या तरुण पर्यटकाचं नाव आहे. तो पवना धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. तब्ब्ल २ तासांनी बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक तरुणांना यश आलं.