ओतूरमध्ये वाळू तस्करी करणाऱ्या ट्रक चालकांवर कारवाई

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील ओतूर हद्दीत बेकायदेशीरपणे चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांवर पुणे ग्रामीण गुन्हे शोध पथकाने कारवाई करून १२ लाख १५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे . अशी

नारायणगाव :  जुन्नर तालुक्यातील ओतूर हद्दीत बेकायदेशीरपणे चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांवर पुणे ग्रामीण गुन्हे शोध पथकाने कारवाई करून १२ लाख १५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे . अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली . 

     ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील पेट्रोलिंग करीत असताना डुंबरवाडी टोलनाका येथे काल दि २६ ला सायंकाळी  टाटा कंपनीच्या हायवा ट्रकच्या  मागील नंबरवर चिखल-माती लावला असल्याचे गुन्हे शोध पथकाला निदर्शनास आल्याने हायवा ट्रक ची तपासणी केली असता ट्रकमध्ये १५ हजार किमतीची विना परवाना तीन  ब्रास वाळु मिळुन आली. या हायवाचा ट्रकचालक सोमनाथ चरणदास निकम वय २१  , रा. जांबुत, ता. संगमनेर, जि. अहमदनगर यांचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे मालक धनंजय डुंबरे रा. ओतुर ता. जुन्नर जि. पुणे यांचे सांगण्यावर  ही वाळु आणल्याचे सांगितले.हि वाळू पारनेर तालुक्यातून आणल्याचे निष्पन्न झाले आहे . पथकाने १२ लाख किमतीचा टाटा कंपनीचा हायवा ट्रक  व त्यातील १५ हजार रुपये किंमतीची तीन ब्रास वाळु असा १२ लाख १५ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे . यापुढील तपास  ओतूर पोलीस हे करीत आहेत . हि कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण चे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस हवालदार सुनील जावळे, शरद बाबळे, पोलीस नाईक  दीपक साबळे, प्रमोद नवले यांनी केली आहे.