विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई; पोलिसांनी केला २४ हजारांचा दंड वसुल

मार्च महिन्यात पाटस पोलीसांनी पाटस आणि वरवंड परिसरात मास्क विना फिरणाऱ्या ७४ दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली. २०० ते ५०० रूपये प्रमाणे पावती फाडून सुमारे २४ हजार २०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये वरवंड आणि पाटस परिसरातील काही व्यापारांचा ही समावेश आहे.

    पाटस: दौंड तालुक्यतील पाटस आणि वरवंड येथे कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर तोंडाला मास्क व लावता फिरणाऱ्या ७४ दुचाकीस्वार यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. मार्च महिन्यात सुमारे २४ हजार २०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आली आहे,अशी माहिती पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे यांनी दिली. दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या ही वाढू लागली आहे. आरोग्य विभाग आणि प्रशासन नागरीकांना तोंडाला मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्िसंगचे पालन करावे,असे आवाहन वारंवार करीत आहे. मात्र काही नागरिकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मास्क न वापरता दुचाकीवर फिरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना सोशल डिस्टन्िसंगचे पालन होताना दिसत नाही. अशांवर यवत आणि पाटस पोलीसांनी कायदेशीर कारवाईचा बडगा उगरला आहे.

    कायदेशीर कारवाईचा उगरला बडगा
    मार्च महिन्यात पाटस पोलीसांनी पाटस आणि वरवंड परिसरात मास्क विना फिरणाऱ्या ७४ दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली. २०० ते ५०० रूपये प्रमाणे पावती फाडून सुमारे २४ हजार २०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये वरवंड आणि पाटस परिसरातील काही व्यापारांचा ही समावेश आहे. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाळासाहेब पानसरे, सागर चव्हाण,पोलीस नाईक घनश्याम चव्हाण, सुधीर काळे, प्रदीप काळे,विजय भापकर, दशरथ कोळेकर, समीर भालेराव, हनुमंत खडके, पोलीस मित्र सोनबा देशमुख आदींच्या पथकांनी ही कारवाई केली.

    तर गुन्हे दाखल करण्यात येतील
    पाटस पोलीस चौकीच्या हद्दीत विनामास्क फिरताना आढळल्यास कारवाई होणार आहे. व्यापारांनी दुकानात सॅनिटायझर आणि विनामास्क वापर न करताना आढळल्यास संबंधित दुकानदार आणि विना मास्क फिरणाऱ्या दुचाकी चालकांवर या पुढे अशीच दंडात्मक कारवाई केली जाईल, वेळ पडल्यास गुन्हे ही दाखल करण्यात येतील, असा इशारा पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे यांनी दिला आहे.