येणपुरे गँगवर मोक्काची कारवाई ; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आदेश

प्रवीण उर्फ पप्पू टोळी प्रमुख आहे. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांच्यावर २०१६ पासून गंभीर गुन्हे दाखल आहेत. निखील गायकवाड या तरुणाला मारहाण करून लुटले होते. तर परिसरात दहशत पसरवली होती. याप्रकरणी त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात या तिघांना अटक केली होती.

    पुणे :  गुंभीर गुन्हे करणाऱ्या तसेच परिसरात दहशत माजवणाऱ्या भारती विद्यापीठ परिसरातील पप्पू येणपुरे गँगवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्काचे आदेश दिले आहेत. प्रविण उर्फ पप्पू अनंता येणपुरे (वय २७), अजित अंकुश धनावडे (वय २४) व अभिजित नंदू बोराटे (वय ३१, सर्व. रा. सच्चाईमाता मंदिर, आंबेगाव खुर्द) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

    प्रवीण उर्फ पप्पू टोळी प्रमुख आहे. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांच्यावर २०१६ पासून गंभीर गुन्हे दाखल आहेत. निखील गायकवाड या तरुणाला मारहाण करून लुटले होते. तर परिसरात दहशत पसरवली होती. याप्रकरणी त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात या तिघांना अटक केली होती.

    दरम्यान प्रवीण उर्फ पप्पू हा वेगवेगळ्या साथीदारांना घेऊन त्याच्या गुन्हेगारी कारवाया करत होता. त्यामुळे त्याची या परिसरात दहशत होती. त्यांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपारीची तसेच प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली होती. पण, त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. त्यामुळे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, संगीता यादव यांनी टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्याकडे पाठवला. या प्रस्तावाची तपासूनकरून त्यांनी हा प्रस्ताव अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे याच्याकडे पाठवला. त्यानी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीवर मोक्काची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ही ४९ वी मोक्का कारवाई आहे.