मास्क न लावता फिरणाऱ्यांवर कारवाई

मंचर : मंचर ता.आंबेगाव येथे तोंडावर मास्क न लावुन फिरणाèयांवर मंचर पोलिस आणि ग्रामपंचायतीने कारवाईचा बडगा उचलत प्रत्येकी ५०० रुपये दंड वसुल करण्यात आला.

 मंचर : मंचर ता.आंबेगाव येथे  तोंडावर मास्क न लावुन फिरणाèयांवर मंचर पोलिस आणि ग्रामपंचायतीने कारवाईचा बडगा उचलत प्रत्येकी ५०० रुपये दंड वसुल करण्यात आला.हि कारवाई मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवार दि.२७ रोजी करण्यात आली.

मंचर शहरात स्थानिक रहिवाशी असलेल्या ज्येष्ठ नागरिकास कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे प्रशासन अलर्ट झाले आहे.येथील विविध दुकानांत विविध वस्तु खरेदीसाठी सुमारे ४० गावांचा दैनंदिन संबध येतो. शहरातील काही नागरिक किंवा बाहेर गावावरुन आलेले नागरिक तोंडावर मास्क किंवा रुमाल तोंडावर न लावता राजरोसपणे फिरत आहे. त्यामुळे कोरोना ंसंसर्ग वाढण्याची शक्यता गृहीत धरुन सरपंच दत्ता गांजाळे, पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे  यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलिस ठाण्याचे सहा पोलिस जवान, मंचर ग्रामपंचायतीचे दोन कर्मचारी यांच्या समन्वयातुन मास्क न लावणाऱ्यावर कारवाई केली आहे.