निरगुडसर येथे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दोघांवर कारवाई

मंचर : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने विनापरवाना विनाकरण बाहेर फिरुन संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दोघांवर मंचर पोलिसांनी कारवाई केली आहे,अशी माहिती पोलीस निरिक्षक

मंचर : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने विनापरवाना विनाकरण बाहेर फिरुन संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दोघांवर मंचर पोलिसांनी कारवाई केली आहे,अशी माहिती पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली. निरगुडसर येथे कोरोनाचा रुग्ण सापडला असून कोरोनाचा संसर्ग वाढू नये. यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार निरगुडसर गाव केंद्रस्थानी धरुन त्याच्या जवळपासचा पाच किलोमीटरचे क्षेत्र हे बंफर क्षेत्र जाहीर केले आहे. कोरोना रुग्ण वाढत असून कोरोनाचा प्रसार वाढू नये. यासाठी प्रशासनाने कोरोना रुग्ण सापडलेल्या गावच्या सीमा बंद केल्या आहेत. कोरोना संसर्ग वाढू नये.म्हणून गावातील कुणीही बाहेर पडू नये किंवा बाहेर कोणीही गावात येऊन संचारबंदीचे उल्लंघन करु नये. असे आदेश असतानाही निरगुडसर येथे शनिवार दि.३० रोजी विनाकारण फिरणारे संतोष सोमा बांबळे वय ३२,किरण महादेव ढोबळे वय ३४ दोघेही राहणार निरगुडसर यांच्यावर मंचर पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबत पोलीस जवान सागर गायकवाड यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.