cattle houses in Daund

कोरोनासारख्या विषाणूपासून सरंक्षण होण्यासाठी डॉक्टरांना जे पीपीई किट दिले जाते ते विषाणूजन्य किट, जैव प्लास्टिक, हैंडग्लोज ई विघातक वस्तू दौंड तालुक्यात गुऱ्हाळ घरात चक्क जाळण्यासाठी मोठमोठ्या ट्रक मधून तालुक्यात येत असल्याचे भयानक चित्र पहायला मिळत असल्याने दौंड तालुक्यासाठी ही बाब चिंताजनक आणि भयभीत करणारी आहे.

पारगाव : संपूर्ण जगावर कोरोनाने आपला विळखा मजबूत केला आहे. प्रशासन कोरोनावर विजय मिळवण्यासाठी अहोरात्र शर्थीचे प्रयत्न करीत आहे. नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासन वारंवार करत आहे. तर दुसरीकडे मात्र दौंड तालुक्यातील काही गुऱ्हाळ घराचे मालक व परप्रांतीय ठेकेदार या आवाहनाला केराची टोपली दाखवताना दिसून येत आहे.

कोरोनासारख्या विषाणूपासून सरंक्षण होण्यासाठी डॉक्टरांना जे पीपीई किट दिले जाते ते विषाणूजन्य किट, जैव प्लास्टिक, हैंडग्लोज ई विघातक वस्तू दौंड तालुक्यात गुऱ्हाळ घरात चक्क जाळण्यासाठी मोठमोठ्या ट्रक मधून तालुक्यात येत असल्याचे भयानक चित्र पहायला मिळत असल्याने दौंड तालुक्यासाठी ही बाब चिंताजनक आणि भयभीत करणारी आहे.

गुऱ्हाळासाठी प्लास्टिक कागद, चप्पल, टायर,रबर,महिलांचे सॅनिटरी पॅड,आदी अविघटनशील पदार्थ या गुऱ्हाळावर गुळ बनवण्यासाठी येत आहेत. त्यातच कोरोनासारख्या विषाणूजन्य पीपीई किट ची यात भर पडली आहे. वास्तविक असा जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन कायदा लागू असताना त्या वस्तू त्याच ठिकाणी नामशेष करण्यात याव्यात. तसे न होता या कायद्याचे उल्लंघन होत आहे.मुळातच मेडिकल वेस्टेजची प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवाना दिलेल्या ठिकाणीच विल्हेवाट लावणे बंधनकारक असताना दौंड तालुक्यात मात्र अशा अविघटनशील पदार्थांचे ट्रक भरून येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यासाठी तालुक्यात असा उद्योग करणाऱ्यांचे रॅकेट असण्याची शक्यता आहे अशी शंका दौंड तालुका शेतकरी राजा संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष राजाराम तांबे यांनी व्यक्त केली आहे.

तसेच अशा अविघटनशील कचऱ्यातून निघणाऱ्या धुरामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहेत, अशा गुऱ्हाळावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी राजाराम तांबे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे १४ सप्टेंबरला लेखी निवेदनाद्वारे केली होती. दौंड तालुक्यात बहुतांश गुऱ्हाळघरे बेकायदेशीर व परप्रांतीय चालवत असल्याने त्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता त्यांच्यासाठी महत्वाची नसून त्यांच्यासाठी पैसा हेच सर्वच असून पैशासाठी स्थानिकांचे जीव धोक्यात घालत आहेत.

अशा बेकायदेशीर व आरोग्यासाठी अपायकारक गुळ बनवणाऱ्या गुऱ्हाळावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी सुत्रधार,संबंधित दवाखाने,गुऱ्हाळ मालक,चालक,ठेकेदार,व वाहतूकदार,अशा समाजासाठी घातक परिणाम करणाऱ्या समाज कंटकावर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी तांबे यांनी १४ सप्टेंबरला लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.

प्रशासनाने त्वरीत याची दखल घ्यावी अन्यथा येत्या २ ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे याठिकाणी आमरण उपोषण करण्याचा इशारा दौंड तालुका शेतकरी राजा संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष राजाराम तांबे यांनी दिला होता परंतु जिल्हाधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने त्या अनुषंगाने ०२ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दौंड तालुका शेतकरी राजा संघर्ष कृती समिती पदाधिकारी यांच्या समवेत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते. याची दखल घेत उपोषणाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. यावेळी अध्यक्ष राजाराम तांबे, उपाध्यक्ष शांताराम बांदल,सचिव मंगेश फडके,प्रजोल जवळकर, संजय पाचंगे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.