दिलासादायक! पुण्यात सक्रीय रुग्ण तीन हजाराच्या आत

गेल्या चाेवीस तासांत शहरांत एकुण ३ हजार ४४१ जणांची चाचणी केली गेली. यात १८७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ३१९ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहे. यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या तीन हजाराच्या खाली आली असून, उपचार सुरू असलेल्या २ हजार ८८८ रुग्णांपैकी ५०२ रुग्णांची प्रकृती गंभीर असून, ७९९ रुग्णांना अाॅक्सिजन पुरवठा केला जात आहे.

    पुणे : शहरातील काेराेना बाधित सक्रीय रुग्णांची संख्या तीन हजाराच्या खाली आली. तर गेल्या तीन महीन्यानंतरच साेमवारी मृत्युची संख्या एक आकडी झाली आहे.

    गेल्या चाेवीस तासांत शहरांत एकुण ३ हजार ४४१ जणांची चाचणी केली गेली. यात १८७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ३१९ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहे. यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या तीन हजाराच्या खाली आली असून, उपचार सुरू असलेल्या २ हजार ८८८ रुग्णांपैकी ५०२ रुग्णांची प्रकृती गंभीर असून, ७९९ रुग्णांना अाॅक्सिजन पुरवठा केला जात आहे. गेल्या चाेवीस तासांत पुण्यातील ७ जणांसह एकुण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकुण ४ लाख ७४ हजार २९९ जणांना काेराेनाची लागण झाली, त्यापैकी ४ लाख ६२ हजार ९२९ जणांनी काेराेनावर मात केली आहे. तर ८ हजार ४८२ जणांचा मृत्यू झाला आहे.