लहान मुलांना ‘यावेळी’ मिळणार लस आदर पुनावाला यांची घोषणा

२ ते १७ या वयोगटात ही लस दिल्यानंतर संबंधिताची प्रतिकारशक्ती कसा प्रतिसाद देते आणि ही लस किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी या चाचण्या घेतल्या जात आहेत. यासाठी देशभरातील एकूण १० ठिकाणांहून ९२० स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी २ ठिकाणे पुण्यातील आहेत.

    पुणे: देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची महिम मोठया जोमात सुरु आहे. मात्र अद्यापही लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस आलेली नसल्यामुळे १८ वर्षांखालील वयोगटातील मुला-मुलींसाठी अजूनही लसीची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला (Other Poonawala is the CEO of Serum Institute)यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

    सिरमच्या कोवाव्हॅक्स(Covovax) लहान मुलांसाठी लसीच्या चाचण्या अगदी सुरळीतपणे सुरू आहेत. सर्व चाचण्या आणि प्रक्रिया जर व्यवस्थित पार पडली, तर पुढील वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये लहान मुलांसाठी लस उपलब्ध होईल, असे अदर पूनावाला म्हणाले आहेत.

    दरम्यान, अदर पूनावाला चाचण्यांच्या प्रक्रियेविषयी माहिती देताना म्हणाले, लहान मुलांसाठी ही लस किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी आम्हाला किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागेल. टप्प्याटप्प्याने यावर आम्ही काम करत आहोत. १२ वर्षांच्या खालील मुलांचा देखील चाचण्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. सर्व पालकांना त्यांची मुले सुरक्षित हवी आहेत. आम्हाला याचा विश्वास वाटतोय की कोवाव्हॅक्सला पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत मंजुरी मिळालेली असेल.

    अमेरिकी लसनिर्मिती कंपनी असलेल्या नोवोव्हॅक्सने गेल्या वर्षी आपल्या लसीच्या उत्पादनासंदर्भात सिरम इन्स्टिट्युटसोबत करार केला आहे. या लसीचे NVX-CoV2373 अर्थात Covovax असे नाव आहे. भारतात चाचण्या घेतली जाणारी ही चौथी लस आहे. २ ते १७ या वयोगटात ही लस दिल्यानंतर संबंधिताची प्रतिकारशक्ती कसा प्रतिसाद देते आणि ही लस किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी या चाचण्या घेतल्या जात आहेत. यासाठी देशभरातील एकूण १० ठिकाणांहून ९२० स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी २ ठिकाणे पुण्यातील आहेत.