बारामतीत १५ नव्या रुग्णांची भर

  • आज रविवार ९ जुलै रोजी बारामती शहर व तालुक्यात नवीन १५ कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या २५१ एवढी झाली आहे. तसेच शहरातील एका कोरोना रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे.

बारामती – बारामतीमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका वाढत आहे. आज रविवार ९ जुलै रोजी बारामती शहर व तालुक्यात नवीन १५ कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या २५१ एवढी झाली आहे. तसेच शहरातील एका कोरोना रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे.   

काल ८ ऑगस्ट रोजी बारामतीमध्ये १०१ संशयित नमुन्यांमध्ये १५ कोरोना संक्रमित रूग्ण आढळून आले होते. परंतु आज या १५ जणांचा कोरोना अहवाल पाहिला असता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात निष्पन्न झाले आहेत. तर ७७ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे ९ अहवाल अजून प्रतिक्षेत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, बारामती शहरातील विवेकानंद नगर, धुमाळवाडी, वसंतनगर, हरिकृपानगर, मुजावरवाडा, इंदापूर रोड आणि म्हाडा कॉलनी अशा काही भागांत कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.